Nashik : नाशिकचा मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ समोर; गुन्हेगारांची गांजा पार्टी VIDEO
थोडक्यात
नाशिक मध्यवर्ती कारागृहच बनला गुन्हेगारांचा अड्डा
नाशिकचा मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ समोर
कारागृहातील एका बॅरेक मध्ये गुन्हेगारांची गांजा पार्टी
(Nashik) नाशिक मध्यवर्ती कारागृहच गुन्हेगारांचा अड्डा बनल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकचा मध्यवर्ती कारागृहातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून कारागृहातील एका बॅरेकमध्ये गुन्हेगारांची गांजा पार्टी चालू असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
याच्याआधी देखील कारागृहामध्ये कैद्यांकडे मोबाईल सापडल्याची घटना घडली होती. या गांजा पार्टीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. गांजा पितानाचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्यात आल्याचे समजते.
हा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असून सदरचा व्हिडिओ कधीचा आहे याचा देखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.