नाशिक
Nashik : नाशिककरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागातील पाणीपुरवठा आज बंद राहणार
दुरुस्तीच्या कामासाठी निम्म्या शहराचा पाणी पुरवठा आज राहणार बंद
थोडक्यात
निम्म्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज बंद
दुरुस्तीच्या कामासाठी निम्म्या शहराचा पाणी पुरवठा आज राहणार बंद
तर उद्या रविवारी देखील येणार कमी दाबाने पाणी
(Nashik) निम्म्या नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी निम्म्या शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार असून तर उद्या रविवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महापालिकेच्या विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील नवीन नाशिक, सिडको, नाशिकरोड आणि नाशिक पूर्व विभागातील परिसरात आज पाणीपुरवठा आज बंद राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.
