Nashik Jindal Company Fire
नाशिक
Nashik Jindal Company Fire : नाशिकच्या जिंदाल कंपनीत अजूनही आग धुमसतेय; आजूबाजूची 4 गावं करण्यात आली रिकामी
नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण आग लागली.
(Nashik Jindal Company Fire) नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण आग लागली. आज चौथा दिवस असून अजूनही आग धुमसतच आहे. संपूर्ण परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन बंब घटनास्थळी आले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जिंदाल कंपनीला लागलेली आग 48 तास उलटूनही नियंत्रणात आलेली नाही. या कंपनीच्या आजूबाजूची 4 गावं रिकामी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आग वेगाने पसरली आहे.
कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत असल्याची माहिती मिळत असून कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत असल्यानं कंपनीपासूनचा 1 किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.