नाशिक
Nashik : नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी बंद; कारण काय?
उद्यापासून कांदा खरेदी-विक्री व्यवहार बंद
(Nashik) नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. उद्यापासून कांदा खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव या मुख्य बाजार समितीमध्ये दीपावलीनिमित्त व्यापारी सुट्टी घेणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. यातच ऐन दिवाळीत शेतकऱ्याला आठ रुपये किलोने कांदा विकावा लागतोय.