Nashik
नाशिक
Nashik : नाशिक जिल्ह्यात गणपती विसर्जनावेळी सहा जणांचा मृत्यू; तर एक बेपत्ता
नाशिक जिल्ह्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना
थोडक्यात
नाशिक जिल्ह्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना
सहा जणांचा मृत्यू; तर एक बेपत्ता
विविध कारणांनी शहरात दोन, तर ग्रामीण भागात चार जण गेले वाहून
( Nashik ) दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. नाशिकमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी सहा जणांचा मृत्यू तर एक जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे.
विसर्जनासह विविध कारणांनी शहरात दोन तर ग्रामीण भागात चार जण वाहून गेले. यामध्ये गोदावरी प्रवाहात प्रवीण शांताराम चव्हाण, बोरगडमध्ये दगडी तलावात चंदर नथू माळेकर, सिन्नर सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे, कळवणमध्ये नदीत दिनेश बाबूराव राजभोज तर गोवर्धनमध्ये विष्णू डगळे यांचा समावेश आहे.