Nashik : पहिल्या टप्प्यातील वृक्षांचे आज वृक्षारोपण करण्यात येणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik) नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध होत आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे.
याच पार्श्वभूमीवर आता तपोवनातील प्रस्तावित वृक्ष तोडीला विरोध आहे तर दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्री येथून झाडे मागविण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजमुन्द्रीवरून निघालेले 15 हजार झाडे नाशकात दाखल दाखल झाले आहे. गिरीश महाजन यांनी राजमुन्द्री येथे जाऊन स्वतः 15 हजार देशी झाडे निवडली. शहराच्या वेगवेगळ्या भागात ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
वड,पिंपळ,निंब, जांभूळ यांची लागवड करण्यात येणार असून आधी 15 हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. 15 हजार झाडं सोमवारी नाशिकमध्ये लावली जाणार असून यातच तपोवनातील वृक्ष तोडीला 15 जानेवारी पर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज हरित नाशिक अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 15 हजार वृक्षांचे आज वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
Summery
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध
हैदराबादच्या राजमुंद्री येथून झाडे मागविण्यात आली
आज पहिल्या टप्प्यातील 15 हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
