Nashik : नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला; गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nashik ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आता भाजपाने एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी महापौर विनायक पांडे आणि यतिन वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत. यासोबतच काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत तर शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत.
Summary
नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला
माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ करणार भाजपात प्रवेश
काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर ?
