Pune Leopard : पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी 5 कॅमेऱ्यांची भर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Leopard ) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
यातच आता पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी 5 कॅमेऱ्यांची भर पडल्याची माहिती मिळत आहे. आता आठ कॅमेऱ्यांद्वारे टेहळणी करण्यात येणार असून विमानतळ कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची माहिती दिली.
यासोबतच भुयारी मार्गांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी तीन ठिकाणी सापळा, पिंजरेदेखील ठेवण्यात आले आहेत. पुणे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू संस्थेचे सदस्य आणि हवाई दलाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण कार्यवाही करण्यात आली.
Summery
बिबट्याचा माग काढण्यासाठी पाच कॅमेऱ्यांची भर
आता आठ कॅमेऱ्यांद्वारे टेहळणी करण्यात येत आहे.
विमानतळ कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची माहिती दिली
