Pune Koyata Gang
पुणे
Pune Koyata Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, तरुणाला कोयत्याने मारहाण, व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील साडे सतरा नळी परिसरातील प्रकार
थोडक्यात
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत
तरुणाला कोयत्याने मारहाण,व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील साडे सतरा नळी परिसरातील प्रकार
(Pune Koyata Gang) पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. तरुणाला कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल माध्यमावर तो व्हायरल करण्यात आला आहे.
मित्रावर हल्ला करायला निघालेल्या कोयता टोळीने मित्र न भेटल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. पुण्यातील साडे सतरा नळी परिसरात ही घटना घडली असून मारहाण करून तरुणाचा व्हिडिओ बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
