पुणे
Pune : पुण्यात कोयते, तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस; 7 ते 8 जणांकडून तरुणावर कोयता, तलवारीने वार
पुण्यात कोयते, तलवारी हातात घेत टोळक्याने धुडगूस घातल्याचे पाहायला मिळत आहे.
(Pune) पुण्यात कोयते, तलवारी हातात घेत टोळक्याने धुडगूस घातल्याचे पाहायला मिळत आहे. कात्रज परिसरात टोळक्याकडून एका तरुणावर वार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 7 ते 8 जणांकडून तरुणावर कोयता, तलवारीने वार करण्यात आला आहे.
कात्रज-कोंढवा रोड परिसरात तरुणांनी हा राडा घातला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वार केल्यानंतर पळून जाताना तरुणांनी हातात तलवारी आणि कोयता नाचवल्याचे पाहायला मिळत आहे.