Pune: पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर झळकले
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. आज सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार असून संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात काका पुतण्याचे एकत्रित बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज संयुक्त जाहीरनामा घोषित होणार आहे. त्याआधी जिथे जाहीरनामा प्रकाशित होणार त्या हॉटेल बाहेर काका पुतण्याचे एकत्र बॅनर झळकले आहे. आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित घोषणा करणार आहेत.
Summary
पुण्यात काका पुतण्याचे एकत्रित लागले बॅनर
शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेम मध्ये
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज संयुक्त जाहीरनामा घोषित होणार

