Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणे दौरा; अधिकाऱ्यांना झापलं, म्हणाले...

पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु

  • पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करणार

  • अजित पवारांनी PMRDA अधिकाऱ्यांना झापलं

(Ajit Pawar) भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यात पाहणी दौरा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांसोबत, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे.

या दौऱ्याच्यावेळी अजित पवारांनी PMRDA अधिकाऱ्यांना झापल्याचे पाहायला मिळत आहे.रिंग रोड आणि बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी अधिकाऱ्याला झापलं. अजित पवार म्हणाले की, काय ओ वसईकर कुठे जाऊन बसता तुम्ही? का 2 मिनिटं उशिर झाला? असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

रस्त्याचा आराखडा अधिकाऱ्यांकडून समजावून घेताना अजित पवार यांनी झापल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबतचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com