BJP : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. राजकीय पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
विकसित पुण्यासाठी 'संकल्प पत्र' हा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा असणार आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यात काय असणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार
मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार
विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र हा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा
