Pune : भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; गुन्हा दाखल, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

(Pune) पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलीस दलातील महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी आता भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद विठ्ठल कोंढरे असं या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आता फरासखाना पोलीस ठाण्यात कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्यावर असताना कोंढरे यांनी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com