Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagwane Case

Vaishnavi Hagwane Case : हगवणे बंधूंनी चुकीचा पत्ता देऊन मिळवले शस्त्र परवाने; कोथरूड, वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(Vaishnavi Hagawane Case ) पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण पसरले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Vaishnavi Hagawane Case ) पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण पसरले आहे. यातच आता हगवणे बंधू शशांक हगवणे, सुशील हगवणेचा नवा प्रताप समोर आला आहे.

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी शशांक हगवणे, सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांना वास्तव्याची बनावट कागदपत्रे सादर करून परवाना मिळवल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी आता रात्री उशिरा वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुशील हगवणे याच्यावर कोथरूडमध्ये तर शशांक हगवणे याच्यावर वारजेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com