Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर; 3 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे करणार भूमिपूजन आणि लोकार्पण
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विकासकामांच लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील 3 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता गणेश कला क्रीडा येथे आयोजित कार्यक्रम आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून पुणे शहरातील 60 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केलं जाणार आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
Summery
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
पुण्यात 3000 कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण
