Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, प्रकाशक आणि वाचकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीजगाथा या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे. या महोत्सवामुळे वाचक, लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमी यांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात चैतन्य निर्माण झाले आहे.
सातारा येथे होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी झाले. उद्घाटनप्रसंगी साहित्य, वाचन संस्कृती आणि समाजातील विचारप्रवाह यांवर भर देण्यात आला. हा पुस्तक महोत्सव 21 डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर सुरू राहणार असून, दररोज विविध साहित्यिक उपक्रम, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन समारंभ तसेच वाचक–लेखक संवादाचे कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या साखळीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुस्तक महोत्सवाला भेट देणार आहेत. यावेळी ते उपस्थितांशी संवाद साधून, त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. त्याचप्रमाणे ते साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे चिल्ड्रेन कॉर्नर आणि छायाचित्र प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता आहे.
Summery
पुणे पुस्तक महोत्सवाला आज फडणवीसांची भेट
राजेश पांडे लिखित गिनिजगाथा पुस्तकाचं प्रकाशन
मुख्यमंत्री प्रकाशक, वाचकांशी साधणार संवाद
