Pune : पुण्यात धंगेकर विरुद्ध आंदेकर निवडणुकीचा सामना रंगणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Pune ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.
काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात धंगेकर विरुद्ध आंदेकर असा निवडणुकीचा सामना रंगणार आहे.
शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली आंदेकर असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये धंगेकर विरुद्ध आंदेकर आमने सामने येणार आहेत. सोनाली आंदेकर या मयत वनराज आंदेकर याच्या पत्नी असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना प्रभाग क्रमांक 24 मधून त्या निवडणूक लढवत आहेत. तर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यादेखील शिवसेनेकडून याच प्रभागातून मैदानात उतरल्या आहेत.
Summary
पुण्यात धंगेकर विरुद्ध आंदेकर निवडणुकीचा सामना रंगणार
प्रभाग क्रमांक 24 मध्ये रविंद्र धंगेकर विरुद्ध आंदेकर आमने सामने
रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यादेखील शिवसेनेकडून याच प्रभागातून मैदानात
