Eknath Khadse : पुणे जमीन व्यवहार प्रकरण; एकनाथ खडसे म्हणाले...
(Eknath Khadse)उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, "कुणाचे संरक्षण पाठिमागे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा विषय आहे."
"मी स्वत: नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता. मी स्वत: म्हटलं होते की, चौकशी पूर्ण होईपर्यंत मी राजीनामा देतो. तसेच अजितदादांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत महिन्यासाठी का होईना राजीनामा देण्याची गरज आहे." असे एकनाथ खडसे म्हणाले.
