Pune Accident
पुणे
Pune Accident : कोथरूडमधील वेद भवन पुलाजवळ भीषण अपघात; एक जण जखमी
कोथरूडमधील वेद भवन पुलाजवळ भीषण अपघात झाला.
(Pune Accident ) कोथरूडमधील वेद भवन पुलाजवळ सोमवारी सकाळी सुमारे 5:10वाजता भीषण अपघात झाला. या दुर्घटनेनंतर एनडीए, वारजे आणि मध्यवर्ती अग्निशमन दलाच्या बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात सुमारे चार ते पाच वाहने एकमेकांना धडकली असून त्यात एक प्रवासी बसही समाविष्ट आहे.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने बसचा चालक वाहनाच्या केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकलेला आढळला. अग्निशमन अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले की, क्रोबार व हायड्रॉलिक कटरसारख्या यंत्रसामग्रीच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.