Pune : पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं तब्बल 24 तास खुली राहणार
थोडक्यात
पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुले
पुणे पोलिसांची फटाक्यांच्या दुकानांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आदेश
(Pune Diwali) दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.सर्वजण दिवाळी सणाच्यानिमित्ताने तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे. बाजारपेठा दिवाळीच्या वस्तूंनी सजल्या आहेत.
यासोबतच फटाके खरेदी करण्यासाठी देखील दुकांनांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर आता फटाकेप्रेमींसाठी खुशखबर असणार आहे. पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार असून फटाक्यांची दुकानं तब्बल 24 तास खुली राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे पोलिसांची फटाक्यांच्या दुकानांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी दिली असून पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश जारी केले आहेत. 21 ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील फटाक्यांच्या दुकानांना 24 तास कार्यरत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.