Pune
पुणे
Pune : पुण्यात सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला.
( Pune ) सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला. एका किरकोळ कारणावरून दोन टोळ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि काही क्षणातच हाणामारी सुरू झाली.
विशेष म्हणजे, यावेळी दोघांनी गावठी पिस्तूल काढून थेट गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाद सुरू झाल्यानंतर तिथे तणाव वाढत गेला आणि दोन पिस्तुलांमधून तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या.
सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनं एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.हा सर्व प्रकार मुख्य रस्त्यावर घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा तपास सुरू असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.