Pune
पुणे
Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
थोडक्यात
पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार,एकजण गंभीर जखमी
प्रकाश धुमाळ असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
(Pune) पुण्यात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या कोथरुडमध्ये ही घटना घडली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
प्रकाश धुमाळ असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या मानेला आणि मांडीला गोळी लागल्याची माहिती मिळत असून यावेळी तीन राउंड फायर करण्यात आले.
कोथरूडच्या शिंदे चाळ जवळ ही फायरिंग झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.