Pune
Pune

Pune : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 2 कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

  • कारवाईत 2 कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

  • 'सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा' उपक्रम

( Pune ) पुण्यात अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 2 कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून 196 आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत हा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याबाबत शंका असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

या कारवाईत खवा, स्वीट मावा, गाईचे तुप, खाद्यतेल, दुध, पनीर, बटर व वनस्पती, भगर आदी अन्न पदार्थाचे एकूण 654 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. यामध्ये दोषी नमुन्यांवर कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com