Pune : पुण्यात 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यात 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक करण्यात आली असून पुण्यातील येरवडा भागात गुन्हे शाखेने ही छापेमारी केली आहे.
पुणे पोलिसांकडून सध्या शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवली जात आहे. येरवडा परिसरात एका रिकाम्या गोडाऊन मध्ये काही पोती भरली असून त्यात तंबाखू आणि गुटखा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गोण्यांमधून लपवून गुटख्याची तस्करी होत असून पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने या सर्व गोण्या जप्त केल्या आहेत.
Summery
पुण्यात 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त
गोण्यांमधून सुरु होती गुटख्याची तस्करी
छापेमारी करत स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक
