पुणे
Pune Heavy Rain : पावसाचा जोर कायम!पुण्यात पावसाची दमदार हजेरी, अतिवृष्टीने गेले 3 बळी
26 मे पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक स्टेशन, रेल्वे स्थानक हे पाण्याखाली गेले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने तीन बळी गेले आहेत.
राज्यात रविवार 25 मे च्या रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस एवढा जोरदार होता की, काल म्हणजेच सोमवार 26 मे ला पुर्ण दिवसभर पावसाला जोर कायम होता. याद अनेकांच मोठं नुकसान झाल, तर अनेक स्टेशन, रेल्वे स्थानक हे पाण्याखाली गेले. पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरुन धरला होता. अशातच पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने तीन बळी गेले आहेत.
कर्वेनगर भागात झाड कोसळून एक दुचाकी स्वार ठार झाला. तर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज कोसळून त्याचा देखील जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. त्याचसोबत दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच धोकादायक ठिकाणी थांबू नये.