Pune Porsche Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी सातही जणांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Porsche Case) पुण्यात कल्याणीनगर भागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याचा जामीन हायकोर्टाने पुन्हा फेटाळून लावला आहे. पुणे पोर्श अपघात प्रकरणी सातही जणांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.
या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. पुणे येथील पोर्श अपघातात आरोपी असणाऱ्या सातही जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे पुरावे देखील बदलण्यात आले होते. आरोपीची सुटका झाल्यास ते साक्षीदारांना धमकावी शकतात असे न्यायालयाचे निरीक्षण असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुणे पोर्श अपघात प्रकरणी आरोपींना दणका
सातही जणांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
भीषण अपघातात झालेला दोन जणांचा मृत्यू
