Pune
Pune

Pune : इंडिगो विमानसेवा विस्कळीत; पुणे विमानतळावर रेल्वेकडून मदत कक्ष स्थापन

इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली. केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.

इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी इंडिगोची बुकींग केली आहे त्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं रेल्वेकडून मदत कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विमान प्रवाशांसाठी रेल्वे कडून पुण्यातून वेगवेगळ्या शहरासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, प्रवाशांना रेल्वेतून प्रवास कसा करता येईल याची माहिती देण्यासाठी पुणे विमानतळावर मदत कक्ष सुरू करण्यात आले असून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते म्हणून रेल्वे कडून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असून काल दिवसभरात पुणे विमानतळावरील 26 विमाने रद्द झालीत.

Summery

  • इंडिगो विमानसेवा विस्कळीत

  • विमानसेवा विस्कळीत झाल्यानं रेल्वेकडून मदत कक्ष स्थापन

  • वेगवेगळ्या शहरासाठी विशेष गाड्यांचे आयोजन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com