Pune Jain Boarding
Pune Jain Boarding

Pune Jain Boarding : जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार

जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत

  • जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार

  • मुरलीधर मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादांनंतर अखेर हे बोर्डिंग सुरू

(Pune Jain Boarding Land Case) पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर ट्विटरवर पोस्ट करत अनेक आरोप केला. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या.

त्यानंतर जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील धर्मदाय आयुक्तालयात पार पडली आणि जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार रद्द करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मिळ आहे.

मुरलीधर मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादांनंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार असून त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com