Pune : पुण्याच्या मुंढवामधील जमीन व्यवहार प्रकरण; अमेडिया कंपनीकडून पुन्हा मुदतवाढीची मागणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
या जमीन व्यवहार प्रकरणात अनेक खुलासे समोर येत असून यातच आता अमेडिया कंपनीकडून पुन्हा मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे दुसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे.
अमेडिया कंपनीकडून सोमवारी पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळावी या संदर्भात अर्ज करण्यात आलेला असून पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीला 42 कोटी रुपयांची नोंदणी शुल्क भरण्याबाबत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बाजवली असून या नोटीसला उत्तर देण्यासाठी कंपनीने 15 दिवसांची मुदत वाढ मागितलेली आहे.
Summery
पुण्याच्या मुंढवामधील जमीन व्यवहार प्रकरण
अमेडिया कंपनीकडून पुन्हा मुदतवाढीची मागणी
नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे दुसऱ्यांदा अर्ज
