Pune Leopard : पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री; वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Leopard ) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. यातच आता पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री झाली असून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना हा बिबट्या दिसला. वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याच्या शोध सुरू झाला असून थर्मल ड्रोनने बिबट्याचा शोध सुरू आहे. रविवारी पहाटे 4नंतर बिबट्याच्या कुठल्या ही खुणा न आढळल्याची माहिती मिळत आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Summery
पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री
शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना दिसला बिबट्या
वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याच्या शोध सुरू
