Pune Bibtya : पुणे विमानतळ परिसरात वावरणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Bibtya) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. यातच आता पुणे विमानतळ परिसरात वावरणारा बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे यांद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवण्यात आले होते.
11 डिसेंबर रोजी सुमारे 30 सदस्यांच्या संयुक्त पथकाने बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहीम आखली. बोगद्याच्या आतील भागातील त्याच्या हालचाली अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी अतिरिक्त live कॅमेरे बसवून कॅमेरा ट्रॅपचे पुनर्स्थापन करण्यात आले. विमानतळाच्या सुरक्षा नियमांमुळे त्याला पकडण्यासाठी नियंत्रित परिस्थिती निर्माण करणे आवश्यक होते.
80 फूट लांबीच्या एका बोगद्यात त्याला नेलं. जिथे या बिबट्याला सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलं आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यात पुणे वनविभाग, RESQ Charitable Trust, भारतीय हवाई दल, आणि पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त पथकाला अखेर यश मिळालं आहे.
Summery
राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागले
पुणे विमानतळ परिसरात वावरणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद
वन विभागाने बिबट्याला बेशुद्ध करुन पकडले
