Pune Leopard
पुणे
Pune Leopard : पुणे शहरात पुन्हा बिबट्याचा वावर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Leopard ) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. यातच आता पुणे शहरात पुन्हा बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून बिबट्या वावरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुण्यात पाषाण सुतारवाडीमध्ये काल रात्री बिबट्या दिसल्याची माहिती मिळत असून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Summery
पुणे शहरात बिबट्याचा वावर
पुण्यात पाषाण सुतारवाडी मध्ये काल रात्री बिबट्या दिसल्याची माहिती
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
