Pune Leopard
पुणे
Pune Leopard : मुंढव्यातील सोसायटीमध्ये दिसला बिबट्या; CCTV कॅमेऱ्यात कैद
राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Leopard ) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. यातच आता पुणे शहरात पुन्हा बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता पुन्हा एकदा पुण्यात मुंढव्यातील सोसायटीमध्ये बिबट्या दिसला आहे. शोध मोहीम सुरु झाली असून मुंढव्यातील अल्कॉन सिल्वर लीफ सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने शोध मोहीम सुरु केली आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुणे मुंढव्यातील सोसायटीमध्ये दिसला बिबट्या
मुंढव्यातील अल्कॉन सिल्वर लीफ सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्या कैद
वन विभागाने शोध मोहीम सुरु केली
