Pune Leopard : पुण्यातील भोर मध्ये बिबट्याचा वावर; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Leopard ) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. यातच आता पुणे शहरात पुन्हा बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यातील भोर मध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत आहे. पारगाव खंडाळा-भोर मार्गावरील अतिट खिंड मार्गावर कान्हवडी येथे नागरिकांना बिबट्याच दर्शन झाले असून कान्हवडीच्या डोंगर परिसरात बछड्यासह बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे.
रात्री 9 च्या सुमारास साताऱ्यातील खंडाळा तालुक्याच्या हद्दीतील कान्हवडी परिसरात हा बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळत असून मोबाईल कॅमेरामध्ये त्याचा व्हिडीओ कैद करण्यात आला आहे. यामुळे आता परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Summery
पुण्यातील भोर मध्ये बिबट्याचा वावर
पारगाव खंडाळा-भोर मार्गावरील अतिट खिंड मार्गावर कान्हवडी येथे नागरिकांना बिबट्याच दर्शन
कान्हवडीच्या डोंगर परिसरात बछड्यासह बिबट्याचा मुक्तसंचार
