Pune Rain Update
Pune Rain Update

Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

पुण्यात पुढील पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pune Rain Update) पुण्यात पुढील पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, या हवामान बदलाचा परिणाम शेती, वीजपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांवर होण्याची शक्यता वर्तवली आहे. दिवसाचे तापमान तुलनेने जास्त असल्यामुळे आणि हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे ही हवामान स्थिती उद्भवत आहे. हवामान विभागाने यासंबंधी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

या हवामान बदलाचा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते, तर फळबागा आणि जनावरांवरही परिणाम होण्याचा धोका आहे. विजेच्या झटक्यामुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊ शकतो तसेच झाडे, विजेचे खांब किंवा तात्पुरती बांधकामे कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी उघड्यावर जाणे टाळावे, झाडांखाली किंवा विजेच्या खांबाखाली थांबू नये, असा सल्ला दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठीही हवामान विभागाने कृषी सल्ला जारी केला आहे. तयार झालेली पिके वेळीच कापून सुरक्षित जागी ठेवावीत, फळझाडांना आधार द्यावा, शेतात पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, सध्या सिंचन किंवा फवारणी टाळावी आणि जनावरांना आच्छादित ठिकाणी हलवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com