Amit Shah
पुणे
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत.
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचं उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज शहर वाहतूक विभागाने कात्रज ते मंतरवाडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.
दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक आणि कात्रज चौक या दरम्यान मालवाहतूक करणारी वाहने, डंपर, मिक्सर, ट्रक, जड व अवजड वाहने तसेच स्लो मुव्हिंग वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
यासोबतच ओढा ते सर्किट हाउस चौक ते आयबी चौक या मार्गावर एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार असून या काळात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस रस्त्यांवर तैनात राहणार आहेत.