Pune
पुणे
Pune : पुण्यातील भाजपचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं खास गिफ्ट
पुण्यातील भाजपचे प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभागासाठी विकासाचे भव्य ‘बर्थडे गिफ्ट’ जाहीर केले आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यातील भाजपचे प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभागासाठी विकासाचे भव्य ‘बर्थडे गिफ्ट’ जाहीर केले आहे.
प्रभाग क्रमांक 9 च्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासाचा स्पष्ट, दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडत अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. यामध्ये महाळुंगे टी.पी. स्कीमला अंतिम मान्यता, शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला गती, तसेच मुळशी धरणातून पुणे शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा यांसारख्या दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण घोषणांचा समावेश आहे.
Summary
मंत्री बावनकुळेंकडून विकासाचे भव्य ‘बर्थडे गिफ्ट’ जाहीर
उमेदवार लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट
पुणे शहरासाठी दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण घोषणा
