Parth Pawar
पुणे
Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; पार्थ पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण
मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Parth Pawar ) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.
या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात प्रमुख असलेले पार्थ पवार सध्या कुठे आहेत. असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ मुंबईत असल्याचे सांगितले आहे. मात्र पार्थ पवार यांचा मोबाईल कॉल्स फॉरवर्ड करण्यात आलाय. त्यामुळे पार्थ पवार आता नेमकं कुठे आहेत अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण
पार्थ पवार सध्या कुठे आहेत. असा सवाल उपस्थित केला जातोय
पार्थ पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण
