Sheetal Tejwani
Sheetal Tejwani

Sheetal Tejwani : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sheetal Tejwani ) पुण्यातील मुंढवा भागातील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली.

शितल तेजवानीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक तिच्या घरी पोहचले. यावेळी कोरेगाव पार्क येथील ऑक्सफर्ड हॉलमार्क या सोसायटीत शितल तेजवानी हीच घर आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता. शितल तेजवानी तपासात सहकार्य करत नसण्याची माहिती मिळत आहे.

कोरेगाव पार्क येथील तेजवानी हिच्या घरी पोलिसांनी एक तास झाडाझडती घेतली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com