Sheetal Tejwani : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी करण्यात येणार, अनेक खुलासे होण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sheetal Tejwani) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.
या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आता मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी करण्यात येणार आहे.
सरकारी पंच आणि स्वतः शितल तेजवानी यांच्या उपस्थितीत मोबाईल एक्सपर्टच्या मदतीने ही तपासणी केली जाणार असून मोबाईलमधील डेटावरून कोणासोबत व्यवहार झाले आहेत का, याची तपासणी व चौकशी होणार आहे.
थोड्याच वेळात शितल तेजवानीला चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणले जाणार असून आज तिच्या मोबाईलचे विश्लेषण आणि तांत्रिक बाबी तपासल्या जाणार आहेत. विशेष मोबाईल तपासणी टीम यासाठी बोलवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण
शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी करण्यात येणार
मोबाईलमधील डेटावरून कोणासोबत व्यवहार झाले आहेत का, याची तपासणी व चौकशी होणार
