Pune Mundhwa land Case : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याची सलग 10 तास चौकशी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले.
या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याची सलग 10 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत असून आर्थिक गुन्हे शाखेकडून ही चौकशी करण्यात आली. यावेळी येवले याचा जबाब ही नोंदवण्यात आला आहे.
अटकेत असलेल्या शीतल तेजवानी आणि येवले यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असून या प्रकरणात शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि अमीडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
Summery
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याची सलग १० तास चौकशी
आर्थिक गुन्हे शाखेने केली चौकशी
शीतल तेजवानी आणि येवले यांची समोरासमोर चौकशी
