Raj Thackeray
Raj Thackeray

Pune MNS : पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट; काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नाही

आगामी महापालिका निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune MNS ) आगामी महापालिका निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नसल्याची माहिती मिळत आहे.

रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसे सहभागी नसल्याचं मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले असून एका शहरात युती नाही आणि दुसऱ्या शहरात युती हे जनतेच्या पचनी पडणार नसल्याने मनसे काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक नसल्याची माहिती अजय शिंदे यांनी दिली आहे.

आघाडी असेल तर ती सर्व महाराष्ट्रासाठी असेल, तर ते योग्य होईल असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summery

  • काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नाही

  • पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट

  • रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसे सहभागी नसल्याचं मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांचे स्पष्टीकरण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com