Nurses Strike
Nurses Strike

Nurses Strike : ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका; रुग्णसेवेवर परिणाम

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संप सुरू केल्यामुळे पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली आहे.
Published on

(Nurses Strike) महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संप सुरू केल्यामुळे पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली आहे. या संपात सुमारे 340 परिचारिका सहभागी झाल्या असून त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे.

संपाचा परिणाम बाह्यरुग्ण (OPD) आणि आंतररुग्ण (IPD) विभागावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक रुग्णांना तपासणी व उपचारासाठी ताटकळत बसावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना करत काही कंत्राटी कर्मचारी आणि निवासी डॉक्टरांच्या मदतीने सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरीही पूर्ण क्षमतेने सेवा देणे कठीण बनले आहे.परिचारिका संघटनेच्या म्हणण्यानुसार, सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दूर करणे, तसेच कंत्राटी पद्धतीने भरतीस विरोध ही त्यांची मुख्य मागणी आहे. या मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

ससून रुग्णालयात सध्या एकूण 939 परिचारिका कार्यरत आहेत, त्यापैकी सुमारे 340 परिचारिकांनी संपात सक्रीय सहभाग घेतला आहे. यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे नियोजित उपचार लांबणीवर टाकावे लागले आहेत.रुग्णांच्या नातेवाइकांमध्येही नाराजीचा सूर आहे.रुग्णालय प्रशासनाने परिचारिकांशी चर्चेच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे. प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चेत सकारात्मक निर्णय झाल्यास लवकरच रुग्णसेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपामुळे आणखी काही दिवस रुग्णसेवा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com