Election : मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज; सुरक्षा व्यवस्था तैनात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे.
सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली असून देहूरोड परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी उभारली आहे.
संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एमबी कॅम्प परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच किवळे विकासनगर भागात संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देहूरोड पोलीस दक्षता घेत आहे. ही संपूर्ण तपासणी मोहीम देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या थेट देखरेखीखाली राबवली जात आहे.
Summary
29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान
मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज
देहूरोड पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
