Pune : पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तुल, 3 जिवंत काडतूस जप्त

पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तुल, 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तुल, 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 22 वर्षीय तरुणाकडे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतूस सापडली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचत त्या तरुणाला अटक केली आहे.

पूर्वेश चव्हाण असे त्या तरुणाचे नाव असून हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. टिळक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ गुन्हे शाखा 3 च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

Summary

  • पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तुल, 3 जिवंत काडतूस जप्त

  • गुन्हे शाखेकडून गुन्हेगार पुर्वेश चव्हाणला अटक

  • टिळक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून कारवाई

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com