Pune Bogus Call Center : पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी
(Pune Bogus Call Center : ) पुणे शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मोठी कारवाई करत धाड टाकली. या कारवाईसाठी 150 ते 200 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हे कॉल सेंटर खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरील 'प्राईड आयकॉन' इमारतीत चालवले जात होते. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक स्थापन करून ही कारवाई केली गेली. या प्रकरणाचा आता सखोल तपास सुरू आहे.
या बनावट कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक युवक-युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते त्या अनुषंगाने पोलीस आता तपास करत आहेत.