Vasantdada Sugar Institute : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vasantdada Sugar Institute ) शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौकशी समितीकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत असून 2009 ते 2025 या वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची समितीने व्हिएसआयकडून मागणी केली आहे.
व्हिएसआयचा मागील सतरा वर्षांच्या लेखापरीक्षण अहवाल देण्याची चौकशी समितीने मागणी केली असून या संदर्भात चौकशी समितीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले आहे. साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समितीचे कामकाज सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता
चौकशी समितीकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात
2009 ते 2025 या वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची समितीने व्हिएसआयकडून केली मागणी
