Pune : पुण्यातील खेडमध्ये कडुस गावात जादूटोण्याचा प्रकार; जादूटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यातील खेडमध्ये कडुस गावात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंद घराच्या दारात दही–भात, लिंबू, हळदकुंकू लावून नारळ फोडतानाचे पाहायला मिळत असून या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन आलेला एक पुरुष भरदुपारी काहीतरी विधी करताना सीसीटीव्हीत दिसत असून त्या पुरुषासोबत एक महिलासुद्धा पाहायला मिळत आहे.
परिसरातील नागरिकांनी जेव्हा त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी मुंबईहून आल्याचे सांगितले. या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू असून त्यातूनच हा जादूटोणा करण्यात आल्याचा तिथल्या काही नागरिकांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Summery
पुण्यातील खेडमध्ये कडुस गावात जादूटोण्याचा प्रकार
जादूटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
बंद घराच्या दारात नारळ फोडतानाची दृश्यं
