Chakan Accident
Chakan Accident

Chakan Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वासुलीफाटा रोडवर बिरदवडी भागात एका भरधाव ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Chakan Accident ) पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वासुलीफाटा रोडवर बिरदवडी भागात एका भरधाव ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात इतका भयावह होता की ट्रकने दोघांना सुमारे 15 ते 20 फूट अंतरापर्यंत फरफटत नेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चाकण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com